Ad will apear here
Next
विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे धडे देण्यासाठी कलसाडी जि. प. शाळेत शिक्षिकेचा पुढाकार


नंदुरबार :
कलसाडी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी शिक्षिका स्नेहल गुगळे यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे. त्यांनी सर्व मुला-मुलींना वर्गात कायम वापरता येण्यासाठी एक स्वच्छता किट वर्गात ठेवले आहे. त्यात आरसा, कंगवा, तेल, टिकली, पावडर, नेलकटर या गोष्टी उपलब्ध आहेत. त्याच्या वापराने आपले आरोग्य कसे चांगले राहील, हे गुगळे यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले आहे.



गुगळे काही दिवसांपूर्वीच बदली होऊन कलसाडी येथील शाळेत रुजू झाल्या. २५ मुले आणि १५ मुली असलेल्या तिसरीच्या वर्गाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. आपला वर्ग, आपले विद्यार्थी स्वच्छ, सुंदर, टापटीप असले पाहिजेत, त्यांना स्वच्छतेचे धडे दिले पाहिजेत आणि त्यासोबत कृतीही व्हावी म्हणून वर्गातील सर्व मुलींना गुगळे यांनी स्वतः हेअर बेल्टचे वाटप केले. केस व्यवस्थित धुवावेत, त्यात हेअर पिन, हेअर बेल्ट लावावा हे त्यांनी मुलींना पटवून दिले आणि वर्गातील मुलींना वर्गातील मुलींच्याच हस्ते हे वाटप करण्यात आले. त्यांच्यातील एकीला अध्यक्ष आणि इतर तिघांना प्रमुख पाहुणे बनवले होते. पहिल्यांदाच आपल्याही हातून काही तरी वाटप झाले, याचा विद्यार्थिनींना आनंद झाला, असे गुगळे यांनी सांगितले. 

वर्गातील सर्व मुला-मुलींना वापरता येण्यासाठी गुगळे यांनी वर्गात एक ‘स्वच्छता किट’सुद्धा आणले आहे. निरोगी शरीरात निरोगी मन वास्तव्यास असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मन प्रसन्न राहण्यासाठी हा छोटासा, पण महत्त्वाचा उपक्रम राबविल्याचे गुगळे यांनी सांगितले.

‘एके दिवशी शिक्षण परिषदेमुळे सकाळची शाळा असल्याने काही विद्यार्थी घाईघाईने शाळेत आल्याने त्यांचे तेल, भांग, टिकली, पावडर राहून गेल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींना मी स्वतः टिकली-पावडर करून डोक्याला तेल लावून, केस विंचरून दिले. स्वच्छता किटचाही वापर केला. एकमेकांकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहणाऱ्या त्या निरागस चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनस्वी आनंद मिळाला आणि केलेल्या कृतीचे समाधान लाभले,’ असा अनुभव गुगळे यांनी सांगितला.

‘मुलांमध्ये चांगले बदल घडविणे आणि त्यांची गुणवत्ता सिद्ध करणे यातच खरा आनंद व समाधान राहणार आहे,’ असे त्यांनी नमूद केले. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZPPCD
Similar Posts
विद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका नंदुरबार : ‘विद्यार्थी माझा पांडुरंग आणि शाळा माझी पंढरी...’ असे मानणाऱ्या शिक्षकांची संख्या आजच्या काळात कमी झाली आहे. अशा मोजक्या शिक्षकांपैकी एक असलेल्या स्नेहल गुगळे यांना यंदाचा राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक म्हणून वेगवेगळे उपक्रम त्या राबवतातच; पण २००९मध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शाळा कलमाडी त
सोन्यासारख्या शिक्षकाला सोन्याची अंगठी नंदुरबार : शिक्षक गावाच्या शाळेसाठी आणि गावासाठीही काय करू शकतात आणि त्या कृतज्ञतेपोटी गाव काय करू शकते, हे कल्पनेच्या पलीकडचे असू शकते. नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील कलमाडी तर्फ बोरद (ता. शहादा) येथील ग्रामस्थांनी चांगले काम करणाऱ्या शिक्षकाला कृतज्ञतेपोटी १० ग्रॅम सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली
मंदिरातील धान्य आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाला नंदुरबार : मंदिरे ही केवळ धार्मिक श्रद्धास्थाने नसून, ती समाजाची प्रेरणास्थाने आहेत, हा विचार जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न नंदुरबारमधील श्री संकष्टा देवी मंदिर ट्रस्टने वेळोवेळी केला आहे. यंदा नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून ट्रस्टने अन्नपूर्णा प्रकल्प ट्रस्टने सुरू केला आहे. मंदिरात भाविकांकडून आलेले सर्व
पुण्यातील शाळांमध्ये वाजणार वॉटर बेल पुणे : मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी आता शाळांमध्ये वॉटर बेल वाजणार आहे. शाळेत खेळण्याच्या किंवा अभ्यासाच्या नादात मुले पाणी प्यायचे विसरतात, त्यामुळे आवश्यकतेपेक्षा कमी पाणी शरीरात जाते. यामुळे अनेक शारीरिक समस्याही निर्माण होतात. ते टाळण्यासाठी आता शाळांमध्ये ठराविक काळानंतर मुलांना पाणी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language